सुमेध वडावाला यांना साहित्यश्री पुरस्कार प्रदान

ज्येष्ठ साहित्यिक सुमेध वडावाला यांना युवक बिरादरीच्यावतीने जाहीर झालेला साहित्यश्रीपुरस्कार प्रदान करण्यात आला. १ लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कथा, कादंबरी, आत्मकथा अशा वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारावर पकड असलेल्या वडावाला यांनी विपूल साहित्य लेखन केले आहे. युवक बिरादरी ऋणानुबंध समारोहात ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांच्या हस्ते वडावाला यांना गौरविण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, खासदार कुमार केतकर, डॉ.भालचंद्र मुणगेकर, डॉ.राजन वेळुकर, वात्रटिकाकार रामदास फुटाणे आदी उपस्थित हते.

Leave a Reply

Close Menu