पर्यटन व्यावसायीकांच्या मेळाव्यातून जिल्ह्याला संजिवनी देणार

वेंगुर्ला येथील साई मंगल कार्यालयात पर्यटन व्यावसायीक महासंघ, सिधुदुर्गतर्फे वेंगुर्ल्यासह जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात विविध स्वरुपाचे व्यवसाय करणा-या व्यावसायीकांची बैठक पर्यटन व्यावसायीक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप (वेंगुर्ला), महेश सामंत, प्रथमेश सावंत, दिलीप कुडव, प्रविण सामंत, उमाकांत आरावंदेकर, संग्राम सावंत, मधुर चिपकर, गुरुनाथ गिरप, नामदेव भुते, गुरुनाथ मडवळ, गोंवंद केळुसकर, विजय ठाकूर, अरुण बागकर, गोविद बागकर, नेहा वेर्णेकर यासह विविध स्वरुपाचे  पर्यटन व्यवसाय करणारे व्यावसायीक उपस्थित होते.

   या बैठकीत पर्यटन महासंघाच्या वेंगुर्लेत तालुका अध्यक्ष पदाच्या रिक्त पदावर भोगवेचे पर्यटन व्यावसायीक महेश सामंत यांची निवड बाबा मोंडकर यांनी जाहीर केली. बैठकीच्या सुरुवातीला पर्यटन व्यावसायीक महासंघाचे तत्कालीन वेंगुर्ला तालुक्याचे अध्यक्ष म्हणून काम करणारे दिनानाथ वेर्णेकर यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

     सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टुरिझमला जागतिक पर्यटन दिवशी म्हणजेच २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ६.३० या वेळेत वेंगुर्ल्यात होणा-या जिल्ह्यास्तरीय पर्यटन व्यावसायिकांचा मेळाव्यातून वेंगुर्ल्यासह जिल्ह्यास संजिवनी देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी या मेळाव्यास केंद्र व राज्य शासनातील मंत्री, पर्यटन विभागाचे अधिकारी यांना निमंत्रित करण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून पर्यटन व्यावसायीकांचे प्रश्न व समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Leave a Reply

Close Menu