मायनिगसाठी एक इंच सुद्धा जागा देणार नाही

जे.एस.डब्ल्यू स्टील लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून धाकोरे, मळेवाड, आसोली, सखैलेखोल, सोन्सुरे या महसूली गावांमध्ये एकूण ८४० हेक्टरमध्ये मायनिग प्रकल्प होऊ घातला आहे. दरम्यान, संबंधीत महसूली गावांतील ग्रामपंचायतींना जनसुनावणी संदर्भात पत्र आले आहे. सोन्सुरे गावात मोठ्या प्रमाणावर पारंपरिक सुरंगीचा व्यवसाय चालतो. या मायनिग प्रकल्पामुळे सुरंगीचा व्यवसाय संपुष्टात येऊन त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ येणार आहे. तसेच येथील जमिनी व घरे या प्रकल्पामुळे बाधित होणार आहेत. म्हणूनच या प्रकल्पाला तीव्र विरोध करण्यासाठी आरवली सरपंच तातोबा कुडव यांच्या अध्यक्षतेखाली सोन्सुरे येथील कोकणेश्वर मंदिरात बैठक संपन्न झाली. या बैठकीला ग्रामस्थ, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सदस्य, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सरपंच कुडव यांनी प्रकल्पाबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती  दिली.

             या मायनिग प्रकल्पाला आम्हा ग्रामस्थांचा विरोध असून या प्रकल्पाला एक इंच सुद्धा जागा उपलब्ध करुन देणार नसल्याचा ठाम निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. तसेच जनसुनावणीला विरोध करणार असून वेळ पडल्यास टोकाचीही भूमिका घ्यायला आम्ही मागेपुढे पहाणार नसल्याचे ठरविण्यात आले.

 

Leave a Reply

Close Menu