वेंगुर्ला आगारास १२ लाखांचे उत्पन्न

गणेशोत्सव कालावधीत मुंबई, बरिवली, विरार, परेल, पुणे या ठिकाणी जाण्यासाठी वेंगुर्ला आगारातर्फे सोडण्यात आलेल्या जादा एस.टी. गाड्यांमधून १८ दिवसांत १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एस.टी.महामंडळातर्फे चाकरमान्यांसाठी गणेशोत्सव कालावधीत जादा बसफे-यांची व्यवस्था करण्यात आली हती. २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत बोरिवली, विरार, परेल, पुणे या मार्गावर बसफे-यांचे नियोजन केले होते. या कालावधीत वेंगुर्ला आगाराला परतीच्या ९७ एस.टी.बस फे-यांमधून १२ लाख ७६६ रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती आगार व्यवस्थापक विशाल शेवाळे व स्थानकप्रमुख निलेश वारंग यांनी दिली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वेंगुर्ला आगाराला जास्त उत्पन्न मिळाले आहे.

Leave a Reply

Close Menu