पेट्रोल पंप संचालक व कर्मचारी यांचा सत्कार

मे महिना आणि गणेश चतुर्थी हा कालावधीत रिक्षा व्यावसायीकांसाठी प्रवासी भाड्याच्यादृष्टीने महत्त्वाचा असतो. अशावेळी पेट्रोल आणि सीएनजीचा पुरवठा खंडित झाल्यास रिक्षा व्यावसायीकांना त्याचा फटका बसतो. मात्र, भटवाडी येथील वरसकर यांनी योग्य नियोजन केल्यामुळे पेट्रोल व सीनएजीचा तुटवडा भासला नाही. रिक्षा व्यावसायीकांनाही दिवसरात्र चांगल्याप्रकारे सेवा दिली. त्यांच्या या सेवेची दखल घेऊन वेंगुर्ला तालुका रिक्षा चालक-मालक संघटने तर्फे पेट्रोल पंपाचे संचालक विजय वरसकर यांचा व सर्व कर्मचा-यांचा त्यांचा सत्कार केला. यावेळी रिक्षा चालक-मालक संघटनेचे तालुका अध्यक्ष एकनाथ राऊळ यांच्यासह बहुसंख्य रिक्षा चालक-मालक उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu