डॉ.चंद्रकांत सावंत यांच्या कार्याची गिनिज बुकात नोंद

       ओवळीये गावचे सुपूत्र आणि मठ प्राथमिक शाळा नं.२चे पदवीधर शिक्षक चंद्राकंत तुकाराम सावंत यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.

      डॉ.सावंत यांनी सावित्रीबाई फुले दत्तक-पालक योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक अशा ७० शाळांमधील ९४ विद्यार्थिनी आणि पाच हायस्कूलमधील ९४ विद्यार्थीनी मिळून ७५ शाळांमधील ११९ विद्यार्थीनी कायमस्वरुपी दत्तक घेत ३ लाख ७४ हजार रुपये कायमस्वरुपी देणगी दिली. या देणगीच्या व्याजातून त्या त्या शाळेतील मुलींचा कायमस्वरुपी शैक्षणिक खर्च करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी आर्थिक परिस्थिती अभावी कर्ज फेडू न शकलेल्या फणसवडे गावातील १६ महिलांचे एकूण ५ लाख ३५ हजार ५२५ रुपयांचे कर्ज फेडून महिलांना कर्जमुक्त केले आहे. तर विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा उपक्रमांसाठी पदरमोड करुन लाखो रुपये खर्च केले आहेत. डॉ.सावंत यांनी गेल्या दोन दशकात समाजहितासाठी लाखो रुपये खर्च करुन केलेल्या सर्वोत्कृष्ट कार्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे.

      डॉ.सावंत यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतल्याबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Close Menu