विमानतळाला बॅ.नाथ पै यांचे नाव देणार

सिधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला बॅ.नाथ पै  विमानतळअसे नाव देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बॅ.नाथ पै यांचा जन्म वेंगुर्ला तालुक्यातील असून त्याला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या अजोड कार्याला वंदन म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. चिपी येथे विमानतळ सुरु झाल्यापासून बॅ.नाथ पै यांचेच नाव देण्यात यावे अशी मागणी सर्वच स्तरातून होत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी विमानतळाला नाथ पै यांचे नाव देण्याची घोषणा केल्यानंतर या निर्णयाचे सिधुदुर्गात स्वागत करण्यात आले. चिपी विमानतळ वेंगुर्ले तालुक्यात असतानाही विमानतळाच्या वेबसाईटवर मालवण तालुकाअसा उल्लेख केला जातो. याबाबतही शासन दरबारी वेंगुर्लेअसा उल्लेख करावा अशी मागणी होत होती. याची दखल मुख्यमंत्री यांनी घेतली असून चिपी-वेंगुर्ले बॅ.नाथ पै विमानतळअसे नाव देण्यात यावे अशा सूचना केल्या आहेत. दरम्यान, २४ सप्टेंबर रोजी कुडाळ येथे झालेल्या बॅ.नाथ पै जन्मशताब्दी अभिवादन सभेत सिधुदुर्ग (चिपी) विमानतळाला बॅ.नाथ पै यांचे नाव देण्यात यावे, असा ठराव ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी मांडला होता. 

 

Leave a Reply

Close Menu