वेंगुर्ला रॉक्समध्ये चार गुहांचा शोध

वेंगुर्ला किना-यावर रॉक्स प्रदेशातील सर्व्हेत चार गुहांचा शोध लागला आहे. त्यापैकी बर्न्ट आयलँडवरील पाखोली ढोल नावाच्या गुहेत २१ अपृष्ठवंशीय प्राण्यांची नोंद झाली असून ४ हजार ७०० पक्षांची घरटी आढळली आहेत. पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील गुहांच्या अभ्यासामुळे त्यांचे संरक्षण करण्यासाठी कांदळवन कक्ष पावले उलचणार आहे.

    मॅनग्रोव्ह अॅण्ड मरिन बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्हेशन फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेने वेंगुर्ला रॉक्सचा अभ्यास केला आहे. जानेवारी ते जून २०२० या कालवधीत सलिम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी अॅण्ड नॅचरल हिस्टरी (सॅकॉन) संस्थेतील संशोधक शिरीष मांची, गोल्डिन क्वाड्रोस आणि धनुषा कावळकर्ते यांनी चार गुहा शोधल्या.

      वेंगुर्ला समुद्र परिसरात भारतीय पाकोळींचा वावर असल्याने तिथे एक विशिष्ट प्रकारची परिसंस्था तयार झाली आहे. त्यात अज्ञात व ओळख न पटलेल्या प्रजाती आहेत. वातावरण बदलामुळे गुहेतील अपृष्ठवंशीयांच्या विविधतेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असे पाणथळ जागांचे शास्त्रज्ञ गोल्डिन क्वाड्रोस यांनी सांगितले. तर वेंगुर्ला खडक द्विपसमुहाच्या गुहेतील प्राणीसृष्टी समजून घेतानाच त्यातील अधिवास व त्यांना असलेला धोका यावर अभ्यास केला आहे. गुहांमधील परिसंस्था आाणि पर्यायी उत्पन्नाच्या माध्यमातून स्थानिक समुदायाच्या शाश्वत विकासासाठी परिसंस्थेच्या सवर्धनाचे महत्त्वही समजून घेतले जात असल्याची माहिती कांदळवन कक्षाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसरंक्षक विरेंद्र तिवारी यनी दिली.

Leave a Reply

Close Menu