आदर्श हिदी अध्यापिका पुरस्कार जाहीर

          हिदी प्रचार सभा वेंगुर्लातर्फे दरवर्षी आदर्श हिदी अध्यापक व अध्यापिका पुरस्कार देण्यात येतात. सन २०२१-२०२२ मध्ये श्रीमती मधुस्मिता माधव अभ्यंकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पुरस्कार आरवली-टांक येथील सरस्वती विद्यालयातील माध्यमिक विभागाच्या शिक्षिका श्रद्धा नाईक यांना तर कै.सौ.सुशिला श्रीकृष्ण सौदागर यच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पुरस्कार उभादांडा शाळा नं.१च्या प्राथमिक शिक्षिका मनाली कांबळी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण संस्थेच्या वर्धापनदिनी म्हणजेच गुढीपाढव्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते केले जाणार असल्याची माहिती हिदी प्रचार संस्थेचे कार्यवाह महेश बोवलेकर यांनी केले आहे.

 

 

 

Leave a Reply

Close Menu