संगिता कुबल यांचा सन्मानपत्राने केला सन्मान

वेंगुर्ला शहराच्या सर्वांगिण विकासासाठी तळमळीने काम करणा-या वेंगुर्ला नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन जनजागृती सेवा समितीमहाराष्ट्रतर्फे सन्मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले आहे.

      ठाणे येथील जनजागृती सेवा समितीमहाराष्ट्र ही सामाजिक संस्था दरवर्षी समाजात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींचा सन्मानपत्र देऊन गौरव करत असते. यावर्षी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल यांना सन्मानपत्र देण्यात आले. सौ. कुबल या स्वच्छतेच्या महायज्ञामध्ये काम करणा-या स्वच्छता कर्मचा-यांबरोबरच कार्यालयात येणा-या नागरिकांना योग्य सेवा हसतमुखाने देत आहेत. तसेच कोरोना काळातही पॉझिटीवह मिळणा-या रुग्णांना संफ करणेत्यांना योग्य वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणेरुग्णांची वेग्गळी व्यवस्था करणेत्यांना लागणारे अन्नधान्य-औषधे पुरविणेअशा रुग्णांच्या कुटुंबियांकडे आपुलकीने लक्ष देणे अशी सर्वच जबाबदारी संगीता कुबल यांना प्रामाणिकपणे सहकारीलोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या समवेत पार पाडली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हे सन्मानपत्र देण्यात आले आहे.

 सांस्कृतिकशैक्षणिककलाक्रिडाआरोग्यमहिला सक्षमिकरणवृक्ष संवर्धनसंरक्षणपर्यावरणव्यसनमुक्ती अशा क्षेत्रातील आपले कार्य गौरवास्पद व भूषणावह असल्याचे सौ.कुबल यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्रामध्ये नमूद केले आहे.   

Leave a Reply

Close Menu