सर्पमित्र महेश राऊळ ‘द रियल हिरो’ पुरस्काराने सन्मानित

विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ पहेणी, जिल्हा-हिंगोली यांच्यातर्फे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्पमित्र म्हणून काम करणारे पुरुष व महिला यांची निवड करून त्यांना द रियल हिरो व शूर तेजस्विनीत पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी तुळस गावचे सुपुत्र, सर्पमित्र तथा प्राणी मित्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुरक्तमित्र रक्तदाता संघटनेचे उपाध्यक्ष महेश राऊळ यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘द रियल हिरो’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ सर्पमित्रांचा समावेश होता.

      महेश राऊळ यांनी अनेक जखमी प्राण्यांवरदेखील उपचार केले आहेत. तर जिल्ह्यामध्ये कुठेही रक्ताची गरज असेल तर त्या ठिकाणी अगदी तासाभराच्या कालावधीत गरजूंना रक्त पुरवण्याचे कार्यही राऊळ करत आहेत.

Leave a Reply

Close Menu