रायफल स्पर्धेमध्ये सानिया आंगचेकरचे यश

पश्‍चिम बंगाल येथील आसनसोल येथे 10 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत संपन्न झालेल्या 31व्या ऑल इंडिया जी.व्ही.मावळंकर शूटिंग चॅम्पिअनशिप (रायफल) स्पर्धेमध्ये वेंगुर्ल्याची सानिया सुदेश आंगचेकर, (एस.पी.के.कॉलेज, सावंतवाडी) हिने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत युथ व ज्युनिअर या वयोगटात सहभाग घेऊन 400 पैकी 381 गुणांची नोंद करीत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले. तसेच 18 वर्ष व 21वर्ष वयोगटामध्ये तिची निवड झाली आहे. या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

      पश्‍चिम बंगाल येथील ही स्पर्धा 10 मीटर पीप साईट प्रकारात घेण्यात आली. यामध्ये 12 राज्यांमधून 1240 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातून सानिया हिने यश संपादन केले आहे. यापूर्वी सानिया हिने डेरवण युथ गेम्स 2020 मध्ये 315/400 स्कोअर करून राज्यस्तरीय ओपन साईड वैयक्तिक सुवर्णपदक पटकाविले होते. तसेच महाराष्ट्र एअर आणि फायरआर्म राज्यस्तरीय, मुंबई स्पध्येमध्ये 2020 मध्ये 374/400 स्कोअर करून पी नॅशनल साठी तिची निवड झाली होती.

      सानिया ही वेंगुर्र्ला येथील उपरकर शूटिंग रेंजवर नेमबाजीचा सराव करत असून तिला प्रशिक्षक कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण तर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Close Menu