शिवसेना ठाकरे गटाला धक्का

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाकडून शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्केदेत असताना वेंगुर्ला भाजपने उभादांडा ग्रा.पं.चे शिवसेना ठाकरे गटाचे सरपंच देवेंद्र डिचोलकर यांना भाजपा मध्ये घेऊन आणखी एक धक्का दिला आहे.

    भाजपचे प्रदेश सरचिटणीस व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविद्र चव्हाण व भाजपा प्रदेश चिटणीस निलेश राणे यांच्या उपस्थितीत श्री. डिचोलकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी उभादांडा गावातील प्रलंबित विकास कामांची चर्चा झाली. यावेळी उभादांडा गावातील विकासकामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असा शब्द पालकमंत्री चव्हाण यांनी सरपंच डिचोलकर यांना दिला. तसेच लवकरच आपल्या सोबत असलेले ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करतील असे डिचोलकर यांनी सांगितले. या पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, दादु कवीटकर आदी उपस्थित होते.

 

 

 

 

Leave a Reply

Close Menu