निवासी वैद्यकीय अधिक्षकांकडून वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाची पहाणी

वेंगुर्ला येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना सोयीसुविधा मिळत नसल्याबाबत वेंगुर्ल्यातील काही नागरिकसंस्था यांच्या मार्फत नाराजी व्यक्त येत होती. या पार्श्वभूमीवर ओरोस येथील निवासी वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुबोध इंगळे यांनी आज वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पहाणी केली. यात ज्या काही रुग्णालयातील त्रुटी आहेत त्या दूर करण्याची कार्यवाही वरिष्ठ पातळीवरुन सुरु असून या ठिकाणी असलेल्या रुग्णांना चांगल्या सुविधा मिळत आहेत तसेच येथील वैद्यकीय अधिकारीकर्मचारी हे आपले काम चोखपणे बजावत असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती डॉ.इंगळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

      तत्पूर्वी डॉ.इंगळे यांनी रुग्णालयातील रुग्णांची चौकशी करुन येथे मिळत असलेल्या वैद्यकीय सेवेबाबत लोकप्रतिनिधीनागरिक यांच्याशी चर्चा केली. यावेळी माजी नगरसेवक पिट्या गावडेसामाजिक कार्यकर्ते तुषार साळगांवकरसत्यवान साटेलकरप्रताप गावस्करउमेश येरमदादा आरोलकररमेश परबहरेश केरकरआबा हुलेईर्शाद शेख यांच्यासह ओरोस येथील महालॅबचे प्रशांत जाधव तसेच उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डॉ.स्वप्नाली पवार-मानेडॉ.गृहिता राव आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना डॉ.इंगळे म्हणाले कीया रुग्णालयातील ज्या काही उणिवा आहेत यात तज्ज्ञ डॉक्टर व रिक्त पदांबाबत वरिष्ठ स्तरावर याचा पाठपुरावा नियमितपणे सुरु आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी रिक्त पदांसंदर्भात आयुक्तांकडे मुद्दे मांडलेले आहेत. रुग्णालयात कर्मचारी संख्या कमी असतानासुद्धा येथील उपस्थित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी तत्परतेने आरोग्य सुविधा देत आहेत. १०२ रुग्णवाहिकेसंदर्भात वाहकाचे पद भरण्याबाबत प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे ज्या उणिवा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण हे रुग्णालय वेंगुर्लावासीयांच्या सेवेसाठी तत्परतेने सुरु होईल असे डॉ.इंगळे म्हणाले.

Leave a Reply

Close Menu