पद्मा केळकर गोवा राज्यात प्रथम

भारतीय संस्कृती प्रबोधिनी संस्थेच्या गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र, शिरोडा-गोव्याची विद्यार्थीनी पद्मा कृष्णाजी केळकर हिने द्वितीय वर्ष बी.ए.एम.एस.परीक्षेत ७८ टक्के गुण मिळवून गोवा विद्यापिठात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

      द्रव्यगुण, रोगनिदान, रसशास्त्र, भैषजकल्पना आणि चरक पूर्वार्ध या सर्व विषयांत पद्मा प्रथम आली आहे. यापूर्वी तिने प्रथम वर्षातही गोवा विद्यापिठात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला होता. तिने द्रव्यगुण विषयात ७९ टक्के गुण मिळविले असून यासाठी डॉ.दास आणि डॉ.प्रतिमा शिकेरकर यांचे मार्गदर्शन लाभले. रोगनिदान विषयात ६८ टक्के गुण मिळविले आहेत. यासाठी डॉ.वैष्णवी टेंगसे यांनी मार्गदर्शन केले. रसशास्त्रमध्ये ८६ टक्के गुण मिळाले असून यासाठी डॉ.स्वामी, डॉ.सुधींद्र, डॉ.आदित्य सामंत, डॉ.अविनाश कांदे आणि डॉ.अनुराधा यांनी मार्गदर्शन केले. चरक पूर्वाध विषयात ७७ टक्के गुण मिळाले असून त्यासाठी डॉ.मोहंती, डॉ.समिर जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.  संस्थेचे अध्यक्ष पी.के.घाटे, कार्यवाह बखले, प्राचार्या अनुरा बाळे यांनी, सर्व प्राध्यापक व रुग्णालय कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

 

Leave a Reply

Close Menu