जागतिक महिला दिन आणि दृष्टीकोन

8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून क्लारा झेटकिन या लढावू बाण्याच्या कम्युनिस्ट कार्यकर्तीने ठराव मांडला व तो पास करण्यात आला. भारतात मुंबई येथे 8 मार्च 1943 साली पहिला जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. आता मात्र दरवर्षी वर्षातून एकदाच जागतिक महिला दिनाचे प्रदर्शन करुन अन्य दिवशी स्त्रीची, तिच्या अस्तित्वाची किंबहूना माणूस म्हणून स्विकारण्याची तसदी न घेणाऱ्या समाजाची कीव करावीशी वाटते. 8 मार्च हा दिवस जो होळी सणाच्या नक्कीच आजूबाजूस वास्तवात असतो. स्त्री वर्गाचे कर्तृत्व, नेतृत्व, गुणगान, कथा-व्यथा यांची सांगड घालून त्यांची प्रशंसा-गुणगान-गौरवोद्गार प्रकट करण्यासाठी एकच दिवस पूरा पडेल का? की होळीच्या अग्नितांडवात आरंभापूर्वीच पूर्णाहुतीची क्रिया पार पडेल? हे दुर्भाग्य दृष्टीस पडल्यास महिला वर्गाच्या मुखातून ‘हमने तो बस कलीयाँ मांगी तो कांटोका हार मिला’, असे वाक्य बाहेर पडू शकते.

      समाजातील पुरुषप्रधान संस्कृतीस अहंकाराचे वरदान आहे. स्वार्थ हा अहंकार आहे. हुकूमशाही प्रस्थापीत केलेली आहे. पण सोयीस्कररित्या विसरले जाते की स्त्री ही रज, तम व सत्व या तीन गुणांची स्वामीनी आहे.

      आपण फादर्स-मदर्स-व्हॅलेंटाईन-फ्रेडशीप अशा प्रकारचे डे साजरे करतो. सोबत रक्षाबंधन-भाऊबीज असे बहीण-भावच्या नात्यासही दृढ करतो. मग अशांची भर पाडून कुटुंबसौख्य-एकोपा आणण्याचा प्रयत्न का केला जात नाही? स्त्री ही कुटुंबाचा मुख्य घटक आहे. तिचा मान-सन्मान-आदर राखण्याची सवय लहान वयातच अंगीकारली गेली तर स्त्रीकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलून आज वेळोवेळी कानावर आदळणारे बलात्कार, छेडछाड, अत्याचार यांना नक्कीच आळा बसेल.

      पूर्व इतिहासात डोकावून पाहिल्यास याच स्त्री वर्गाचे होणारे बालविवाह, विधवा म्हणून समाजातील त्यांचा वावर, माहेर-सासर दोन्ही बाजूने असणारी बंधने तर आज स्त्री लिंग चाचणी करुन घेऊन होणारी गर्भहत्या. दुसऱ्या बाजूस देवीचे महात्म्य सांगणारे श्‍लोक, स्तोत्र म्हणण्यात कोणता पुरुषार्थ!

      आजच्या युगातील स्त्री तर पुरुषाच्या खांद्यास खांदा लावून सर्व त्याच्याच क्षेत्रात वरचढ ठरलेली आहे. भारतीय नारी अंतराळात पोहोचली. रेल्वे-बस-टॅक्सी-रिक्षा चालविण्याची जबाबदारी ती पेलते. वकीली-न्यायाधीश-न्यायमूर्ती पदावर विराजमान होऊन न्यायदानाचे काम करते. इंजिनीयर-डॉक्टर्स-सी.ए अगदी देशाच्या तीनही सैन्यदलातही हेच काम राज्यसभा-लोकसभा-विधानसभा-विधान परिषद यातही स्त्री वर्गाचा आवाज घुमघुमतो. आपल्या कर्तृत्वाने ती राष्ट्रपतीही होते. एवढे असूनही अजूनही स्त्री वर्गाकडून कोणास काय अपेक्षित आहे? ज्यामुळे स्त्रीवर्ग अन्याय-अत्याचार मुक्त होऊन निर्भयरीत्या आपले हक्काचे जीवन जगू शकेल? म्हणूनच आजची स्त्री असं म्हणू इच्छिते,

       छोडो कलकी बाते – कलकी बात पुरानी। नये दौरमे लिख देंगे ‘मिलकर’ स्त्री की कहानी…..

– श्री. अभय गोवेकर, 9969620700

Leave a Reply

Close Menu