लक्ष्मी करंगळे

आयबीपीएस परीक्षेत वेंगुर्ला कॅम्प येथील लक्ष्मी करंगळे हिने यश मिळवत अॅग्रिकल्चर फिल्ड ऑफिसर हा क्लास वन ऑफिसर बनण्याचा मान मिळविला आहे. तिचे बारावी पर्यंतचे शिक्षण बॅ.खर्डेकर महाविद्यालयात झाले. तर बीएससी अॅग्रिकल्चर दापोली येथे तिने पूर्ण केला. यावर्षी घेतलेल्या आयबीपीएस परीक्षेमध्ये तिन्ही टप्पे पूर्ण करुन जवळजवळ संपूर्ण देशभरातून साडेतीन लाख विद्यार्थ्यांमधून ९०६ विद्यार्थी निवडले गेले.

 

Leave a Reply

Close Menu