सामाजिकतेचे वास्तव!

               नुकतीच एक समाज माध्यमातून आलेली एक पोस्ट वाचनात आली. त्यातून डिजिटल इंडियामधील ख¬या भारताचा वास्तववादी चेहरा नजरेसमोर आला. तत् प्रसंगी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यात चटकन पाणी आल्यावाचून राहिले नाही म्हणून हा करण्यात आलेला लेखन प्रपंच. एका बांधकामावर काम करणा¬या एका स्त्रीचा एक लहान मुलगा एका कोप¬यात बसून इतर मुलांचा पकडापकडीचा खेळ पहात असतो, कुणी धडपडले तर स्वत: टाळ्या वाजवत हसत असतो पण स्वत: मात्र तो खेळात सहभागी होत नाही. त्याला जेव्हा त्याच्या न खेळण्याविषयीची कारण विचारलं गेलं तेव्हा त्याने त्याच्या डोळ्याच्या धारदार नजरेने दिलेले उत्तर जगातले विखरी सत्य सांगून जाते ते म्हणजे त्याची आई त्याला सांगते की बाळा खेळायला जाऊ नकोस. कारण खेळून खेळून जर तू दमलास व तूला भूक लागली तर तूला मी तत्क्षणी मी काय खायला देणार? मुलाच्या आईचा हा काळीज पिळवटून टाकणारा सवाल सर्वसामान्य संवेदनशील माणसाच्या अंतर्मनाचा वेध घेणारा निश्चितच आहे.
आजवर जागतिक लोकसंख्येच्या बाबतीत आपल्या देशाचा दुसरा क्रमांक म्हणजे चीन देशाच्या मागे होता. परंतु, नुकत्याच झालेल्या संयुक्तराष्ट्र संघाच्या जनगणनेच्या आकडेवारी नुसार भारताची सन 2023ची लोकसंख्या 1428.60 दशलक्ष असून चीन देशाची लोकसंख्या 1425.70 दशलक्ष आहे म्हणजेच सध्याची देशाची लोकसंख्या जगात पहिल्या क्रमांकावर आहे की जी देशाच्या प्रगतीला आगामी काळात धोकादायक ठरू शकते. भारताच्या सध्याच्या आर्थिक विकासाच्या प्रतवारीनुसार देशात आर्थिक विषमतेची दरी दिवसेंदिवस रुंदावताना दिसत आहे. देश केवळ महासत्ता बनविण्याच्या आभासी महत्त्वाकांक्षेपायी आर्थिक विकासाचा दर निश्चितच उंचावताना दिसत नाही. कारण, देशाची आर्थिक सत्ता काही मूठभर गर्भ श्रीमंतांच्या, भांडवलदरांच्या, राजकीय व सामाजिक व्यÏक्तच्या वळचणीला बांधली गेल्याचे दिसते. तर समाजातील मध्यमवर्गीयांची स्तिथी म्हणजे न घरका ना घाटका अशी. ना धड उच्च प्रतीच जीवन जगता येत नाही निकृष्ट प्रतीच. अशा आर्थिक द्विधा मन:स्थितीत त्याचे जीवन आहे तर शेवटच्या स्तरातील समाज की, जो उद्याच्या आर्थिक विवंचनेत सतत गुरफटलेला असतो. दिवसभर कष्ट करून प्रसंगी दोन वेळच्या खाण्याला सुद्धा मुकणारा. त्याला त्याला कधी या कष्टाच्या वणव्यात मोकळा श्वास घेण्यास मिळतच नाही, परंतु येणारा प्रत्येक दिवस साजरा करण्यातच धन्यता मानणारा समाज.
आपला देश कृषी प्रधान देश म्हणून जगात ओळखला जातो. परंतु, ज्या शेतक¬यांच्या परिश्रमावर, कष्टांवर आपण ही बिरूदावली आजवर मिरवत आलो आहोत त्यांच्या कष्टांचे कितपद चीज होत आहे हा संशोधनाचा विषय बनत चालला आहे. आजवर जर ख¬या अर्थाने बळीराजाच्या परिश्रमाचे चीज झाले असते तर देशात प्रतिदिनी शेतकरी आत्महत्या केल्या गेल्या नसत्या. शेतीच्या योग्य हमीभावासाठी मोर्चे काढावे लागले नसते. निसर्गाच्या अवकाळी स्वरूपामुळे झालेल्या शेतीच्या, घरादारांच्या नुकसान भरपाईसाठी मोर्चे, आंदोलने, करावी लागली नसती. देशात काही ठिकाणी प्रगतीच्या नावाखाली सर्वसामान्य माणसांच्या घरादारांची, जमिनीची परवड झाली नसती. देशाची प्रगती होणे निश्चितच गरजेचे आहे. पण त्यासाठी केवळ सर्वसामान्यांनीच आत्मबलिदान का करावं? ह्रा सर्वसामान्यात निर्माण होणा¬या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. देशात उपासमारीने कुपोषणाचे बळी जाणा¬यांची संख्या दुर्दैवाने वाढताना दिसते. मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात मूलभूत सुविधेअभावी कुपोषणांची संख्या वाढत आहे त्याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. आजही देशातील किमान 30-40 टक्के जनता अपु¬या अन्नधान्यच्या अभावी प्रसंगी दोन वेळच्या पोटभर अन्नाला मुकताना दिसत आहे. शासनाने जरी सर्वसामान्य गरीब जनतेसाठी सरकारी गोदामातून कमी दरात किंवा प्रसंगी मोफत धान्य पुरवठा केला असला तरी सुद्धा देशात काही ठिकाणी अजूनही असा मागासलेला समाज अस्तित्वात आहे की जो स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीतही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. विकासापासून कैक मैल दूर आहे. स्वातंत्र्याची पहाटदुर्दैवाने अजूनही त्याच्या झोपडीत उगवली नाही अशा समाजाकडे देशाच्या नागरिकत्वाची साक्ष देणारे शिधा पत्रिका कार्ड कोठून उपलब्ध होणार? ह्राचा विचार होणे गरजेचे आहे व जर त्यांच्याकडे कार्डच उपलब्ध नसेल तर त्यांना सरकारी सुविधाच12ा लाभ कसा होणार ह्राचा विचार होणे गरजेचे आहे. अन्यथा सरकारी अन्नधान्य पुरवठ¬ावर दिवसाढवळ्या डल्ला मारणा¬यांची संख्या आपल्या देशात निश्चितच कमी नाही.
देशात एकीकडे काही समाज व्यवस्थेकडून जेवणावर अमर्याद खर्च केला जातो, काही प्रसंगी अन्न वाया जाण्याचे दुर्दैवी प्रकारही होऊ घातले जातात. मिष्टान्न पचविण्यासाठी निरनिराळ्या औषध गोळ्यांचा भडीमार शरीरात केला जातो तर दुसरीकडे समाजात काही ठिकाणी काबाडकष्ट करून दोनवेळच्या अन्नाला पारखं होणा¬यांची संख्या लक्षणीय आहे. प्रसंगी नासधूस करण्यात आलेल्या अन्नावरही आपल्या पोटाची भूक भागविणा¬यांची संख्याही देशात कमी नाही. जी आई आपल्या मुलाला सांगते की, “बेटा तू खेळायला जाऊ नकोस कारण जर तू खेळून दमलास व तूला भूक लागली तर ती क्षमविण्यासाठी मी तूला काय देऊ?’ ही जी सामाजिक विषमतेची दरी दिवसेंदिवस रुंदावत जात आहे त्याचा संबंधीतानी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे तरच देशाचे महासत्ता बनण्याचे स्वप्न ख¬या अर्थाने अस्तित्वात येईल.                                               -संजय तांबे, फोंडाघाट (9420261888)

Leave a Reply

Close Menu