बाबली वायंगणकर व अंकिता बांदेकर यांची निवड

सिधुदुर्ग भंडारी सहकारी पतपेढी मर्यादित वेंगुर्ला या पतपेढीची वार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.  सिधुदुर्ग भंडारी सहकारी पतपेढी मर्यादित वेंगुर्ला या पतपेढीची सन २०२२-२३ ते २०२७-२८ या पंचवार्षिक कालावधीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. परंतु, सर्वांच्या सहकार्याने ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली. यात चेअरमनपदी बाबली वायंगणकर तर व्हाईस चेअरमनपदी अंकिता बांदेकर तसेच संचालक मंडळावर रमेश नार्वेकर, श्रीकृष्ण पेडणेकर, प्रकाश गडेकर, नंदन वेंगुर्लेकर, समाधान बांदवलकर, सारिका काळसेकर, जयराम वायंगणकर, जगन्नाथ डोंगरे यांचा समावेश आहे. निवड प्रक्रियेनंतर पतपेढीच्या व्यवस्थापक अनिता रेडकर, कर्मचारी सुस्मिता परब, मेघना राऊळ, हेमंत साळगांवकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी प्रशांत साळगांवकर यांनी काम पाहिले. 

        दरम्यान, पतपेढीची स्थापना १९ मार्च १९९४ साली झाली. प्रथम संस्थापक अध्यक्ष कै.गोविदराव भगवान पेडणेकर यांनी चालू केलेली पतपेढी आजपर्यंत योग्य दिशेने काम करत आहे. आजपर्यंतच्या सर्व संचालकांनी पतपेढीची पत वाढविण्यासाठी प्रयत्न केले. तसेच काम आम्ही नविन संचालक मंडळ करू असे आश्वासन बाबली वायंगणकर यांनी दिले.

 

Leave a Reply

Close Menu