रक्तदान शिबिरात २५ दात्यांचे रक्तदान

जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मित्रमंडळ, अजित राऊळ मित्रमंडळ व लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तिस­या वर्षी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरावेळी २५ दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. उद्घाटन कलावलयचे अध्यक्ष सुरेंद्र खामकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडळाचे संस्थापक सदस्य अजित राऊळ, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, सिधुरक्त मित्रचे महेश राऊळ, बँक ऑफ इंडियाचे माजी कर्मचारी सतिश डुबळे, माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, डॉ.राहूल पाटील, माजी नगरसेवक यशवंत किनळेकर, अॅड.नविना राऊळ, पेडणेकर, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा वेंगुर्ल्याचे शाखाधिकारी पुरुषोत्तम राऊळ, उपशाखाधिकारी चक्रपाणी गवंड, प्रकाश मालवणकर उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी जबरदस्त मित्रमंडळाचे सदस्य निलेश परब, बापू वेंगुर्लेकर, ज्ञानेश्वर रेडकर, कौशल मुळीक, विवेक राऊळ, गजानन गोलतकर, सागर शिरसाट, बाबा वेंगुर्लेकर, देवेंद्र गावडे, अशोक कोलगांवकर, हितेश राऊळ, वैभव फटजी, निखिल नाईक आदींनी परिश्रम घेतले.

 

Leave a Reply

Close Menu