वेंगुर्ला हायस्कूल सन १९७५ सालच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन वेंगुर्ला येथील हॉटेल कोकण किनारामध्ये २४ मे रोजी संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात त्यावेळच्या शालेय प्रार्थनेने झाली. त्यानंतर दिवंगत मित्रमैत्रिणी व शिक्षक यांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमासाठी शामा परब बाई पी.एम.परब हे माजी शिक्षक तर आत्ताचे मुख्याध्यापक पी.डी.कांबळे व श्री. सामंत हे आवर्जून उपस्थित होते.
अनेक विद्यार्थ्यांनी शाळेच्या आठवणी जागवल्या. माजी विद्यार्थी काळे यांनी उतारवयातील शारीरिक आणि मानसिक आरोग्य याची काळजी घेण्याविषयी उपयुक्त माहिती दिली. पी.एम.परब यांनी आपले उर्वरित आयुष्य कोणताही तणाव न ठेवता आनंदाने घालवण्याचा बहमोल सल्ला दिला. सामंत सरांनी या विद्यार्थ्यांच्या अतूट मैत्रीचे कौतुक केले. कांबळे सरांनी विद्यार्थ्यांच्या पुढील संपूर्ण आयुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली. या कार्यक्रमाला मुंबई, गोवा, देवगड, पुणे व वेंगुर्ला पंचक्रोशी येथून ३० माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती हते. शालेय आठवणी कार्यक्रमामध्ये सुचित्रा भोरे-मोहिते यांनी उत्तम सूत्रसंचालन केले. फर्नांडिस सर प्रकृति अस्वस्थ्यामुळे येवू शकत नसल्याने विनायक बर्वे, दिपक लांडगे, मधुकर घाडी, सुचित्रा भोरे-मोहिते यांनी गडहिंग्लजला त्यांच्या घरी जावून त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. २३ मे रोजी या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला भेटदिली. आपल्या जुन्या वर्गात बसले. सामंत सरांनी विद्यार्थ्यांची हजेरी घेतली. समास हा मराठी व्याकरणाचा भाग शिकून परत विद्यार्थीदशा अनुभवली. त्यानंतर निशाण तलाव, आजूबाजूचा परिसर,नविन झुलता पुल, बंदर या ठिकाणांना भेटी देऊन सहलीचा आनंद लुटला. वेंगुर्लास्थित माजी विद्यार्थी मनोहर पडते व शशिकांत वारंग यांनी अधिकाधिक स्थानिक माजी विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास प्रोत्साहित केले. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये आवडता असणाया विनायक बर्वे यांनी दोन महिने अविरत मेहनत घेतली व संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन व नेतृत्व केले.