पावसाळ्यापूर्वी जीर्ण विद्युत खांब बदला

तुळस पंचक्रोशीतील गावांमध्ये ब­याच ठिकाणी विद्युत खांब जीर्ण झालेले आहेत तसेच काही ठिकाणी विद्युत वाहिनीवर झाडी वाढली असून आगामी पावसाळ्यात वादळी वारे, जोराचा पाऊस यामुळे असे खांब पडून नुकसान तसेच जीवितहानी घडू शकते. त्याचप्रमाणे विद्युत प्रवाह सुद्धा खंडीत होऊ शकतो. याचा त्रास सर्व विज ग्राहकांना होऊ शकतो यासाठी तुळस गावासह पंचक्रोशीतील होडावडा, वजराट, मातोंड, अणसुर, पाल गावात जीर्ण झालेल्या विद्युत खांब लवकरात लवकर बदलण्यात यावेत तसेच लाईनवर आलेली झाडी साफ करण्यात यावी यासंदर्भात तुळस येथील सामाजिक कार्यकर्त्या सुजाता पडवळ यांच्या नेतृत्वाखाली गावातील महिलांनी महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी उपविभागाच्या वेंगुर्ला उपकार्यकारी अभियंता यांची भेटघेत निवेदन दिले. यावेळी भक्ती आरोंदेकर, विद्या आंगचेकर, मनाली चुडजी आदी महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Close Menu