‘मैत्री ८९‘तर्फे कार्मिस आल्मेडा यांचा सत्कार

वेंगुर्ला येथील रा.कृ.पाटकर हायस्कूलमधील १९८९ सालच्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी मैत्री ८९या शिर्षकाखाली माजी विद्यार्थ्यांचा ग्रुप बनविला आहे.  या ग्रुपतर्फे स्नेहसंमेलनाबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमही राबविले जात आहेत. या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात संपन्न झाला. या स्नेहमेळाव्याचे औचित्य साधून शासनाच्या योजना गोरगरीबांपर्यंत पोहचविणारे, गेली १८ वर्षे स्वतः पुढाकार घेऊन रक्तदान शिबिर आयोजित करणारे तसेच कोरोना काळात लोकांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न करणारे उभादांडा गावचे रहिवासी कार्मिस आल्मेडा यांचा मैत्री ८९तर्फे सत्कार करण्यात आला.

 

Leave a Reply

Close Menu