वटपौर्णिमा उत्साहात साजरी

वटसावित्री दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करुन आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. हा वटपौर्णिमेचा सण तालुक्यासह शहरात महिलांनी उत्साहात साजरा केला. काही महिलांनी वटवृक्षाच्या झाडाकडे एकत्र येत तर काही महिलांनी घरोघरी वडाच्या फांदीचे पूजन केले. यावर्षी पाऊस नसल्याने महिलांचा आनंद ओसंडून वहात होता.

      वेंगुर्ला शहरात साकव व घोडेबांव उद्यान येथे सकाळपासूनच महिलांची गर्दी होती. ब्राह्मणांच्या मंत्र घोषात महिलांनी वटवृक्षाची पूजा केली. नविन लग्न झालेल्या नवदांपत्यांची ही पहिलीच वटपौर्णिमा होती. त्यामुळे अशा नवदांपत्यांनी वटवृक्षाची पूजा केली. महिलांनी वडाला सुत गुंडाळून आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर एकमेकांना रानमेव्यांचे वाण देऊन शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Close Menu