महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अंतर्गत येणाया महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम २०२३ स्थापन झाला आहे. या आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची तर सदस्यपदी मातोंड-गोवळवाडी येथील दिपक भगत यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड केली आहे.
दिपक भगत हे स्टेट बँक ऑफ इंडियामधून अधिकारी पदावरून निवृत्त झालेले असून त्यांनी सुरूवातीपासून अभाविप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिदू परिषदेचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून काम केले आहे. सन १९८७ ते १९९२ या कालावधीत त्यांच्यावर अभाविपची जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी होती. सातत्याने गो-सेवा या क्षेत्रात कार्यरत असलेले दिपक भगत यांचा नैसर्गिक शेतीवर भर असून ते नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देतात. त्यांचा स्वतःचा फळ प्रक्रिया उद्योग व कलम नर्सरी उद्योग आहे. अशाप्रकारे गो-सेवा प्रकल्पाशी निगडित असलेले दिपक भगत यांची महाराष्ट्र राज्याच्या ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या‘ राज्यस्तरीय सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग भाजपातर्फे अभिनंदन केले आहे.