डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब कोकण आयडॉल पुरस्काराने सन्मानित

ग्लोबल कोकण, कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण व्हिजन फोरम आणि कोकण क्लबच्या वतीने देण्यात येणारा कोकण आयडॉल सन्मान 2023 पुरस्कार मसुरे चांदेरवाडीचे सुपुत्र आणि मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांना तंजावर तामिळनाडूचे राजे श्रीमंत बाबाजी भोसले छत्रपती आणि श्री. रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते देऊन मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.

      डॉ. दीपक परब यांच्या आजवरच्या सामाजिक, शैक्षणिक उद्योग, कला, क्रीडा, कृषी, पर्यटन आदी क्षेत्रात लोकाभिमुख भरीव अशा कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. डॉ. दीपक परब हे मालवण येथील भंडारी हायस्कूलचे विद्यार्थी होते. श्री स्वामी समर्थ एयर फ्राईट प्रायव्हेट लिमिटेड, कोकण ऍग्रो प्रा. लि.  या कंपनीचे संचालक असून उद्योग क्षेत्रात मुंबई तसेच सिंधुदुर्ग मध्ये त्यांचे मोठे नाव आहे. गोर गरीब जनतेला त्यांनी रोजगार मिळवून दिला आहे. शैक्षणिक क्षेत्रात मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबईचे ते अध्यक्ष असून या क्षेत्रातही त्यांनी भरीव असे योगदान दिले आहे. विविध ठिकाणी अनेक क्रीडा स्पर्धा भरवून त्यांनी क्रीडा क्षेत्रातही मोठा नावलौकिक मिळविला आहे. सामाजिक क्षेत्रात अनेक गरीब गरजू रुग्ण, गरीब विद्यार्थी, निराधार माता, वृद्ध, दीन दुबळ्या भगिनी यांना वेळोवेळी आर्थिक मदत करून त्या सर्वांना खंबीर असे पाठबळ दिले आहे. गावातील धार्मिक क्षेत्रातही त्यांचे वेळोवेळी मोठे योगदान असते. पर्यटनाच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी विविध देशांचे भेटीगाठी घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा सहित महाराष्ट्रामध्ये पर्यटनातून रोजगाराची संधी निर्माण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. यासाठी त्यांनी विविध देशांच्या पंतप्रधान महोदयांच्याही गाठीभेटी घेऊन पर्यटना साठी चालना दिलेली आहे. तसेच कृषी क्षेत्रामध्ये ही त्यांनी आधुनिक शेती द्वारे रोजगाराची संधी जिल्हावासियांना उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी त्यांना विविध क्षेत्रातील तालुका, जिल्हा, राज्य, आंतरराज्य असे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.आज विविध संघटनांची विविध शेत्रातील अध्यक्षपद डॉ दीपक परब हे भूषवित आहेत. विविध कार्यकारी सोसायटी यांच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठीही मोठे योगदान दिले आहे.

      या कार्यक्रमास ग्लोबल कोकण व कोकण क्लबचे अध्यक्ष व  कार्यक्रमाचे सयोजक श्री संजय यादवराव, श्री. कुणाल टिळक डॉ अनिल देशपांडे,राज्याचे माजी मुख्य सचिव श्री. द. म. सुखथनकर, कोकण कृषी विद्यापीठ दापोली कुलगुरू  डॉ संजय भावे सौ राधिका परब व अन्य उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu