सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान कणकवलीतर्फे दिला जाणारा दुसरा सरस्वती लक्ष्मण पवार साहित्य पुरस्कार डॉ. रुपेश पाटकर यांच्या ‘अर्जमधील दिवस‘ या पुस्तकाला जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर सभागृह येथे गुरुवार दि. 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अलीकडेच सिंधु वैभव साहित्य समूहाचा मधुसूदन नानिवडेकर पुरस्कार मिळालेल्या कवयित्री अंजली मुतालिक यांचाही सत्कार करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘अन्यायरहित जिंदगी’ या शरीर विक्री व्यवसायातील समस्येवर काम करणारे अरूण पांडे असून डॉ. संजीव लिंगवत, वेंगुर्ला आणि पत्रकार देवयानी वरसकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. गेल्यावर्षी हा पुरस्कार मिळालेल्या दिशा पिंकी शेख या कार्यक्रमात ऑनलाईन सहभाग घेणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानच्या शुभांगी पवार यांनी केले आहे.