सोल्जर ऑफ कॉन्स्टिट्यूशन पुरस्काराने नामदेव मठकर यांचा सन्मान

      ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ऍडव्होकेट्स अँड असोसिएशन्स न्यू दिल्ली तर्फे दि. 28 जुलै रोजी जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्गचे सेवानिवृत्त अधीक्षक एन. पी. मठकर यांना न्यायालयीन सेवेत कार्यरत असताना उत्कृष्ठ सेवेबद्दल सोल्जर ऑफ कॉन्स्टिट्यूशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिलीच्या शताब्दी निमित्त ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ऍडव्होकेट्स अँड असोसिएशन्स दिल्ली तर्फे 36 वर्ष 9 महिने न्यायालयीन सेवा उत्कृष्ट पणे पूर्ण करून सेवा निवृत्त झालेले मठकर यांचेसह उत्कृष्ट वकिली करणाऱ्या कर्नाटक, झारखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील 101 मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. असोसिएशन्स चे अध्यक्ष ॲड. रवी जाधव, वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. प्रकाश जगताप यांच्या हस्ते मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Close Menu