शिरोडा येथील रोटरी क्लबच्या वार्षिक सभेत रेडी येथील जारमाव प्रॉडक्टस्च्या डॉ. रविंद्र भगत यांचा रोटरी क्लबचे गव्हर्नर श्री. अशोक नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करून आयुर्वेदातील आयुर्वेदप्रवीण (डी.एस्.ए.सी.) ही पदवी प्राप्त केली व नंतर आपले वडील वैद्य घनःश्याम पुंडलिक भगत यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने श्री जारमाव प्रसाद प्रॉडक्टस् ही आयुर्वेद निर्मितीची फर्म स्थापन केली. व त्यावेळच्या अतिदुर्गम भागातही आधुनिक तंत्रज्ञान, पॅकिंग, मार्केटींग, जाहिरात तंत्र वापरून ही बनवलेली औषधे नावारुपाला आणली. पदवी प्राप्त झाल्यावर नेहमीचा नोकरीचा सरधोपट मार्ग न निवडता व्यवसाय सुरू करुन गावात आदर्श निर्माण केला. रोटरी क्लबचे कार्यवाह भालचंद्र दिक्षित यांनी डॉ. रविंद्र भगत यांच्या एकूण वाटचालीचे कौतुक करत असताना आजही निरनिराळी औषध निर्मीतीच्या त्यांच्या ध्यासाबद्दल गौरवोद्गार काढले.