साडेतीन वर्षाचा जिल्हाधिकारी पदाचा कार्यकाळ आणि त्यापूर्वी दोन वर्षांचा जि.प.मुख्यकार्यकारी पदाचा कार्यकाळ अशी तब्बल साडेपाच वर्षे यशस्वी कार्यभार सांभाळल्यानंतर सिधुदुर्गच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांची कोल्हापूर येथे बदली झाली असून त्या कोल्हापूर मनपाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. दरम्यान, किशोर तावडे यांची सिधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.