जिल्हा व्हॉलीबॉल स्पर्धेत मदर तेरेसाचे यश

सिंधुदुर्ग जिल्हा शालेय महिला व्हॉलीबॉल स्पर्धा वेंगुर्ला-कॅम्प मैदानावर पार पाडल्या. यात मदर तेरेसा स्कूलच्या १४ वर्षा खालील संघाने अंतिम विजेतेपद तर १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने देखील अंतिम विजेतेपद मिळविले आहे. या दोन्ही संघांना वेंगुर्ला आर.के.स्पोर्ट अकॅडमीचे संस्थापक राधाकृष्ण पेडणेकर व मदर तेरेसा स्कूलचे क्रीडा शिक्षक संदेश रेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक फादर फेलेक्स लोबो व शिक्षक कर्मचारी, वेंगुर्ल पॅरिस कौन्सिल मेंबर कार्मिस आल्मेडा यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Close Menu