जालना येथील मराठा समाजावरील लाठीचार्ज प्रकरणाचा आम्ही निषेध व्यक्त करतो. मात्र या प्रकरणातून विरोधी पक्षातील विरोधक केवळ राजकारण करण्याचा कुटील प्रयत्न करीत असून जाणीवपुर्वक मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांची बदनामी करीत आहेत. तसेच गोरगरीब यांना आवश्यक असलेल्या मराठा आरक्षण प्रकरणाची ढाल करून विरोधी पक्षातील नेते तसेच कार्यकर्ते राजकारण करीत आहेत. त्याची सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वेंगुर्ला मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन ४ सप्टेंबर रोजी पोलिस ठाण्यात दिले.
सहाय्यक पोलिस निरीक्षक विद्या जाधव यांनी हे निवेदन स्विकारले. यावेळी मराठा समाजाचे प्रसन्ना देसाई, रामकृष्ण सावंत, बिटू गावडे, उदय गावडे, सुनिल धाग, सत्यवान परब, शितल आंगचेकर, सुजाता देसाई, दिलीप परब, नारायण गावडे, सत्यविजय गावडे, किशोर परब, श्रीकृष्ण परब, मयुरेश शिरोडकर, महादेव गावडे, दयानंद येरेम, बालकृष्ण येरम, नारायण गावडे, समिर गोसावी, निलेश गवस, विष्णू परब, बंड्या पाटील यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते.
