पाककला स्पर्धेत दर्शना नानचे प्रथम

पाटकर हायस्कूल येथे तृणधान्यावर आधारित पार पडलेल्या तालुकास्तरीय पाककला स्पर्धेत दर्शना निलेश नानचे (परुळे) यांच्या ज्वारीचे आप्पेला प्रथम, प्राची प्रविण मेस्त्री (आरवली) यांच्या भरडधान्य थाळीला द्वितीय तर डॉ.सई संजिव लिगवत (वेंगुर्ला) यांच्या तृणधान्य कबाबला तृतीय क्रमांक मिळाला. स्पर्धेचे परीक्षण मॅक्स फुड लॅब वेंगुर्ल्याचे संचालक गजानन पारकर, डॉ.सुप्रिया रावळ व वेंगुर्ला कृषी विभागाच्या प्रभाग समन्वयक रेखा परूळेकर यांनी केले. विजेत्यांना प्रमाणपत्र वितरप्रसंगी गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, शिक्षणविस्तार अधिकारी भाकरे, वेंगुर्ला केंद्रप्रमुख आव्हाड, वेतोरे केंद्रप्रमुख नितीन कदम, मातोंड केंद्रप्रमुख लवू चव्हाण, पाल केंद्रप्रमुख कावळे, उभादांडा केंद्रप्रमुख अडुळकर, विषयतज्ज्ञ सावंत, तांडेल, प्रा.महेश बोवलेकर, मुख्याध्यापक आत्माराम सोकटे उपस्थित होते. सूत्रसंचालन पाटकर हायस्कूलच्या शक्षिका मनिषा खरात यांनी केले.

Leave a Reply

Close Menu