‘माझी वसुंधरा ४.०‘ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषद, ग्रीन नेचर क्लब, बॅ.खर्डेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मधुसुदन कालेलकर सभागृहात घेण्यात आलेल्या फुलपाखरू उत्सवात प्रि. एम.आर. देसाई इंग्लिश मिडीयम स्कूलच्या लहान विद्यार्थीनींनी फुलपाखरांच्या वेशभूषेसह नृत्य करीत उपस्थितांची मने जिकली.
फुलपाखरांच्या प्रजातींची विविधता समजून घेणे, फुलपाखरांची वैज्ञानिक मोजणी कशी करावी याची माहिती देणे, फुलपाखरांचा मधुरस आणि खाद्य वनस्पतींचे संवर्धन करणे या उद्देशाने फुलपाखरू उत्सवाचे आयोजन केले होते. यानिमित्त फुलपाखरांच्या प्रतिकृतींनी हा परिसर सुशोभित केला होता. बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नितीन कवठणकर व करिष्मा मोहिते यांनी वेंगुर्ल्यात आढळणा-या फुलपाखरांच्या विविधतेबद्दल, त्यांच्या नोंदी व संवर्धनाबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्याधिकाी परितोष कंकाळ, नगरपरिषदेच्या पर्यावरण दूत डॉ.धनश्री पाटील, स्वच्छता ब्रॅण्ड अॅम्बेसडर प्रा.सुनिल नांदोसकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, सुहास गवंडळकर, श्रेया मयेकर, सुषमा खानोलकर, पत्रकार के.जी.गावडे, दाजी नाईक, दिपेश परब यांच्यासह खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ला हायस्कूल, पाटकर हायस्कूल, तालुका शाळा नं.१ व ४, वडखोल शाळा यांचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार वैभव म्हाकवेकर यांनी मानले. याच कार्यक्रमात केंद्र शासनामार्फत ‘इंडियन स्वच्छता लीग – सीझन २‘ ही स्पर्धा आयोजित केली असून यात वेंगुर्ला नगरपरिषदेने ‘वेंगुर्ला आयकॉनस‘ नावाने सहभाग घेतला आहे. याचाही शुभारंभ वसुंधरा शपथ घेऊन करण्यात आला.