वेंगुर्ला शहर व उभादांडा या भागातील नागरिकांनी दोन्ही गावांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ‘वेंगुर्ला मांडवी ते नवाबाग रस्ता‘ पुलाच्या माध्यमातून व्हावा अशा शिवसेनेकडे केलेल्या मागणीचे निवेदन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे वेंगुर्ल शहर शिवसेना प्रमुख उमेश येरम यांनी सचिन वालावलकर, नितीन मांजरेकर, बाळा दळवी, संतोष परब, अॅड.श्रद्धा बावीस्कर-परब, सुनील डुबळे, शबाना शेख, मनाली परब यांच्या उपस्थितीत सादर केले. हा पुल बांधला गेल्यास नागरीक, पर्यटक, स्थानिक बेरोजगार व मच्छिमारांना फायदा होणार असून नवाबाग येथील फिशरमन व्हीलेज प्रकल्प सुद्धा यशस्वी होणार आहे. येथे कांदवळवन सफारी प्रकल्प असल्यानेही पर्यटन वाढेल. मांडवी ते नवाबाग यातील अंतर सुमारे ३० ते ४० मीटर एवढे असून आवश्यक तो निधी मंजूर करून हे विकास काम करावे असे निवेदनात म्हटले आहे.