शहरात कुत्रिम गणेश विसर्जन तलावांची निर्मिती

गणेश मूर्ती विसर्जनासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेने वेशी भटवाडी व वडखोल येथे कुत्रिम गणेश विसर्जन तलाव तयार केले आहेत. तसेच या ठिकाणी विद्युत व्यवस्था, फुलांची सजावट, रंगरंगोटी करून हा परिसर सुशोभित करण्यात आला आहे. तसेच शहरातील सर्व विसर्जन घाटांवर ‘माझी वसुंधरा‘ अभियानाचे संदेश लिहिलेले निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहे. गणेशभक्तांनी गणेश विसर्जन करताना सर्व निर्माल्य ठेवण्यात आलेल्या कलशामध्ये टाकून पर्यावरणाचे प्रदुषण रोखण्यासाठी सहकार्य करावे. पर्यावरण रक्षण ही काळाची गरज असून पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊन पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजर करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Close Menu