►वेंगुर्ला पोलिस ठाणे येथे श्रीसत्यनारायण महापूजा व दशावतारी नाट्यप्रयोग

वेंगुर्ला पोलिस ठाणे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपतीचे उत्साहात पूजन करण्यात आले आहे. यानिमित्त रोज याठिकाणी संगीत व वारकरी भजने संपन्न होत आहेत. या गणपतीचे १७ दिवसांनी गुरूवारी सायंकाळी मांडवी खाडी येथे विसर्जन होणार आहे. 

      दरम्यानमंगळवार दि.३ ऑक्टोबर रोजी याठिकाणी श्रीसत्यनारायण महापूजेचे आयोजन केले आहे. त्यानतर रात्रौ ७ वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचा दणदणीत दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा तसेच नाट्यप्रयोगालाही उपस्थित रहावे असे आवाहन वेंगुर्ला पोलिस ठाणेच्यावतीने पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Close Menu