श्री सद्गुरू नारायण महाराजांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी ह.भ.प.गो.आ.चांदेरकर महाराजांनी अनेक वर्षे सामुदायिक कार्तिकी वायी वाया काढल्या आहेत. यावर्षी वेंगुर्ला ते पंढरपूर ४८वी कार्तिकी पायी वारी १४ नोव्हेंबर रोजी सद्गुरू नारायण महाराज श्रीगोंदेकर गुरूकुल आश्रमातून सकाळी प्रस्थान करणार आहे. १४ रोजी दुपारी बिपिन वरसकर (भटवाडी), रात्री सुरेश नाईक (मठ), १५ रोजी सकाळी कै.चंदूशेठ बाग, दुपारी कामळेवीर, रात्रौ बबन नाईक (कोलगांव), १६ रोजी दुपारी साटम महाराज मठ, रात्रौ आंबोली, १७ रोजी दुपारी आजरा, रात्रौ निपाणी, १८ रोजी दुपारी नरसिहवाडी, रात्रौ मिरज, १९ रोजी दुपारी नागज, रात्रौ पंढरपूर, २० ते २४ नोव्हेंबरपर्यंत पंढरपूर मुक्काम, दि.२५ रोजी वारकरी आपापल्या घरी येतील. ज्यांना या वारीत सहभागी व्हायचे आहे त्यांनी श्री सद्गुरू चांदेरकर महाराज शिष्यगुण कमिटी, द्वारा-ह.भ.प.सावळाराम कृष्णा कुर्ले (९४२१२३५१५३), श्री सद्गुरू नारायण महाराज श्रीगोंदेकर गुरूकुल आश्रम, वेंगुर्ला येथे संफ साधावा.