व्यापा-यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार-सचिन वालावलकर

वेंगुर्ला बाजारपेठ मित्रमंडळाच्या दीपावली शो टाईमचे उद्घाटन

वेंगुर्ला शहरात विकासात्मक काम करत असताना वेळोवेळी येथील व्यापा-यांच्या प्रश्नांना शासन दरबारी वाचा फोडण्याचे काम दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून झाले आहे. या बाजारपेठेतील व्यापारी खरोखरच प्रामाणिकपणे व्यापार करीत आहेत. यापुढेही इतर प्रश्न सोडविण्यासाठी व्यापा-यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे आश्वासन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ला बाजारपेठेतील दिपावली शो टाईमच्या उद्घाटनप्रसंगी व्यापा-यांना दिले.

      वेंगुर्ला बाजारपेठ मित्रमंडळ व वेंगुर्ला शहर शिवसेनातर्फे गाडीअड्डा नाका येथे आजपासून दिपावली शो टाईमचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन सचिन वालावलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम तसेच सेनेचे बाळा दळवी, सुनिल डुबळे, संतोष परब, रविना राऊळ, मनाली परब, शाम कौलगेकर, प्रभाकर पडते, रमेश येरम यांच्यासह बाजारपेठ मित्रमंडळाचे अशोक ठोंबरे, जयेश गावडे, स्वप्नील पांडजी, बाळा आरावंदेकर, महेश केरकर, संदिप गावडे, सदा पांजरी, विजय गुरखा, राकेश सापळे, यशवंत किनळेकर, मिलिद केरकर, प्रितम जाधव, सदा शारबिद्रे आदी उपस्थित होते. 

      वेंगुर्ला बाजारपेठेत हे व्यापारी सकाळपासून रात्रौपर्यंत व्यापार करीत असतात. आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो या भावनेतून या दीपावली शो टाईमचे केलेले आयोजन हे कौतुकास्पद असल्याचे उमेश येरम यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी रेकॉर्ड डान्स संपन्न झाले.

Leave a Reply

Close Menu