सागर सुरक्षा कवच मोहिमेनिमित्त वाहनांची तपासणी

सागर किनारपट्टीच्या सुरक्षेच्यादृष्टीने १६ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ल्यात सागर सुरक्षा कवच मोहिम राबविण्यात आली. रेडी किनारपट्टी ते हरिचरणगिरी किनारपट्टीपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. तसेच मानसीश्वर मंदिरसमोर मुख्य मार्गावर, रेडी चेक पोस्ट आदी ठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत वेंगुर्ला पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी, पोलीस अंमलदार, होमगार्ड, वॉर्डन, सागर रक्षक सदस्य, एनसीसी कॅडेट आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Close Menu