चारूता दळवी यांना व्यासंगी वाचक पुरस्कार जाहीर

  वेंगुर्ला येथील नगर वाचनालयातर्फे दिला जाणारा सुदत्त कल्याण निधी पुरस्कृत यावर्षीचा व्यासंगी पुरस्कार संस्थेच्या वर्गणीदार सभासद सौ. चारूता विलास दळवी यांना जाहीर झाला आहे.

      हा पुरस्कार 23 जून रोजी सकाळी 10 वाजता वेंगुर्ला दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश डी.वाय.रायरीकर यच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. कै. श्रीराम मंत्री यांच्या कायम निधीमधून सन 2004 पासून हा व्यासंगी वाचक पुरस्कार देण्यात येतो. सौ. चारूता दळवी यांना त्यांच्या वैविध्यपूर्ण वाचनाबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Close Menu