कोकण पदवीधरमध्ये डावखरेंची हॅट्ट्रीक

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्यावर मोठी आघाडी घेत विजयाची हॅट्ट्रीक केली आहे. डावखरेंना 1 लाख 719 तर कीर यांना 28 हजार 585 मते मिळाली. निरंजन डावखरे विजयी झाल्याचे घोषित होताच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर महाराष्ट्र भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी निरंजन डावखरे व त्यांच्या पत्नी निलिमा डावखरे यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Close Menu