आशिया-पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियनद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित आशियाई-ओशियन कॉलेज रोबोट स्पर्धेसाठी त्यागराज स्टेडीयम, न्यू दिल्ली येथे आयआयटी दिल्लीने आयोजित केलेल्या दूरदर्शन रोबोकॉन इंडिया – 2024 स्पर्धेत डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी पीस युनिव्हर्सिटी, पुणे या कॉलेजचे प्रतिनिधित्व करताना कुमार ऋषिकेश संजय घोगळे यांनी चमकदार कामगिरी करताना सांघिक व्दितीय उपविजेतेपद पटकावले.
21व्या शतकात त्यांच्या देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या समान आवडी असलेल्या तरुण वर्गात मैत्री निर्माण करणे आणि प्रदेशात अभियांत्रिकी आणि प्रसारण तंत्रज्ञानाची प्रगती करणे हा या हेतूने दिनांक १३ ते १४ जुलै, २०२४ या कालावधित न्यू दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत देशभरातील प्रमुख अभियांत्रिकी महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता. ऋषिकेश घोगळे यांनी राष्ट्रीय स्तरावरील मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अप्पर कोषागार अधिकारी तसेच प्रसिध्द लेखक आणि व्यंगचित्रकार श्री संजय घोगळे यांचे ते सुपुत्र होत.