श्रीनिवास मयेकर तालुक्यात प्रथम

वेंगुर्ला शाळा नं.३ चा विद्यार्थी श्रीनिवास बाबूरावमयेकर हा पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ८६.५७ टक्के गुण मिळवून वेंगुर्ला तालुक्यात प्रथम आला आहे. तसेच तो शहरी विभागातून शिष्यवृत्तीधारक ठरला आहे. त्याला मुख्याध्यापक शंकर सावंत, राकेश देसाई, मानसी नाईक, पूनम रेडकर तसेच त्याची आई नम्रता मयेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल शा. व्य. समिती अध्यक्ष मारूती कुडाळकर, पालक संघाचे उपाध्यक्ष अमृत काणेकर, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष वेदिका सामंत यांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान, वेंगुर्ला भाजपाच्यावतीने प्रसन्ना देसाई व अॅड.सुषमा प्रभूखानोलकर यांनी शाळेत जाऊन कु. श्रीनिवास मयेकर याचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला. 

 

Leave a Reply

Close Menu