आषाढी एकादशीचे औचित्य साधून भाजपाच्यावतीने प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते वेंगुर्ला येथील चांदेरकर महाराज विठ्ठल मंदिरातील दहा ज्येष्ठ वारकयांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी भाजपाचे प्रसन्ना देसाई, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, दिलीप गिरप, बाबली वायंगणकर, वसंत तांडेल, सुजाता पडवळ, वृंदा गवंडळकर, श्रेया मयेकर, प्रशांत आपटे, रवींद्र शिरसाठ, पुंडलिक हळदणकर, निलेश गवस, सत्यवान पालव यांच्यासह बहुसंख्य वारकरी उपस्थित होते. हरीभक्तांची वारी सुखद करण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असून देशातील प्रमुख तीर्थस्थळांचे दर्शन ज्येष्ठ नागरिकांना घेता यावे यासाठी प्रती व्यक्ती ३० हजार रूपये प्रवास खर्च शासनाकडून मिळणार आहे. तसेच तीर्थक्षेत्रांचा विकास, कीर्तनकार, वारकयांना अन्न, सुरक्षा, वैद्यकीय मदत, विमाकवच, पायाभूत सुविधा महामंडळामार्फत पुरविल्या जाणार असल्याची माहिती प्रसन्ना देसाई यांनी वारकयांना दिली.