इनरव्हीलचा पदग्रहण सोहळा संपन्न

इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ल्याचा पदग्रहण सोहळा १५ जुलै रोजी येथील साई डिलक्स हॉल येथे संपन्न झाला. इनरव्हीलच्या इन्स्टालिग ऑफिसर मृणालिनी कशाळकर यांनी इनरव्हीलच्या वेंगुर्ला अध्यक्ष मंजूषा आरोलकर, सेक्रेटरी ज्योती देसाई, खजिनदार श्रीया परब व नूतन सदस्य वैभवी दाभोलकर यांना शपथ देण्यात आली. याप्रसंगी माजी अध्यक्ष वृंदा गवंडळकर, उपाध्यक्ष अफशान कौरी यांच्यासह सई चव्हाण, रेखा नाईक, पुनम बोवेलकर, आकांक्षा परब, रसिका मठकर, रोटरीचे योगेश नाईक, अॅड.प्रथमेश नाईक, आनंद बांदेकर, अंकिता बांदेकर तसेच सावंतवाडी इनरव्हील क्लबचे सदस्य उपस्थित होते. मृणालिनी कशाळकर यांनी क्लब सदस्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन ज्योती देसाई व गौरी मराठे यांनी केले.  

 

Leave a Reply

Close Menu