बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्याचे वाटप

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व महाराष्ट्र शासनाकडून वेंगुर्ला तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना त्यांच्या संसारासाठी हातभार म्हणून गृहपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम साई दरबार येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, कामगार आघाडी प्रदेश उपाध्यक्ष नारायण सावंत यांच्या हस्ते झाला. यावेळी वसंत तांडेल, मनवेल फर्नांडिस, कामगार आघाडी सावंतवाडी विधानसभा प्रमुख सत्यम सावंत, बाबली वायंगणकर, पपू परब, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, आसोली उपसरपंच संकेत धुरी, किरण कुबल, विनोद सावंत, नाना राऊळ इत्यादी उपस्थित होते. तसेच बांधकाम कामगारांचे ऑफलाईन फॉर्म तात्काळ मंजूर होण्यासाठी खासदार नारायण राणे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील ६ हजार ४३२ बांधकाम कामगारांना याचा फायदा मिळणार असल्याचे प्रसन्ना देसाई यांनी सांगितले.

Leave a Reply

Close Menu