वेंगुर्ला शाळा नं. 1 च्या तिसऱ्या मजल्यावर माझे वडील तीर्थरुप कै. वासुदेव शांताराम नाईक व आई कै. सौ. तिलोत्तमा वासुदेव नाईक यांच्या स्मरणार्थ कै. वासुदेव शांताराम नाईक यांच्या कुटुंबियांनी ‘विठाई सभागृह’ बांधले आहे. सदर सभागृहाचा लोकार्पण सोहळा रविवार दि. 28 जुलै रोजी पार पडला.
आता आपण जाणू घेऊ कै. वासुदेव नाईक हे कोण? तर जुन्या पिढीतील मोठे घाऊक नारळ व्यापारी. मूलतः पू. प्रा. शाळा नं. 1 असलेली जमीन 1844 साली आमचे पणजोबा कै. काशिनाथ आत्माराम नाईक यांनी बक्षिसपत्राद्वारे त्यावेळच्या रत्नागिरी जिल्हापरिषदेकडे दिली. त्यास 150 ते 170 वर्षे झाली. त्यावेळी वेंगुर्ला नगरपरिषद अस्तित्वात नव्हती.
आमच्या वडिलांना एकूण 14 मुले. त्यात 7 मुलगे व 7 मुली. आमच्या वडिलांनी आमचे चांगल्या प्रकारे संगोपन केले व शालेय शिक्षण 11 वी पर्यंत दिले. त्या काळात वेंगुर्ल्यात महाविद्यालय नव्हते. म्हणून उच्चशिक्षण मुंबई व कोल्हापूर येथे घेतले. माझे बहिण-भाऊ चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन नावारुपाला आले आहेत.
आमच्या कुटुंबातील बरेच सदस्य अमेरिका, स्वित्झर्लण्ड, ग्रेटब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, न्यूझीलंडमध्ये पसरलेले आहेत. डॉक्टर व इंजिनियर, पी.एच.डी. अशाप्रकारे शिक्षण घेतलेले आहेत. त्यापैकी काहींचा परिचय…
1) डॉ. महेश प्रभू- कॉस्मेटीक सर्जन, शाहूपुरी कोल्हापूर येथे हॉस्पीटल आहे. त्याचा भाऊ डॉ. संतोष प्रभू न्यूरॉलॉजिस्ट (मेंदूतज्ज्ञ) आहे. त्याचे मोठे हॉस्पीटल आहे. भारतात 5 वा क्रमांक लागतो. दोघेही एम.डी. आहेत.
2) डॉ. सचिन रॉय- गोरेगाव पश्चिम स्टेशन रोड येथे स्कीन स्पेशालिस्ट आहेत. अमेरिकेत शिक्षण झाले. त्वचारोग तज्ज्ञ सर्वात मोठी डिग्री घेतली आहे.
3) रीना राय- पी.एच.डी., आयबीएम.
4) डॉ. अप्पू राय- एफ.आर.सी.एस. इंग्लंड.
5) डॉ. संतोष प्रभू- दातांचे स्वतःचे एअर कंडिशन मोठे हॉस्पीटल आहे. त्यांच्या पत्नीही डॉक्टर आहेत.
6) डॉ. गुरुदत्त आनंद नाईक- एम.डी. अमेरिका येथे स्थायिक.
7) माझा लहान भाऊ डॉ. विद्याधर नाईक- एम.बी.बी.एस. बोरिवली काजूपाडा येथे प्रॅक्टीस. त्याची पत्नीपण डॉक्टर आहे. मुलगा अमेय एम.डी. असून सर्वजण बोरिवली येथे प्रॅक्टीस करतात.
माझी एक बहीण तामिळनाडू येथे राहाते. तिच्या दोन मुली लंडनला स्थायिक आहेत. दोन्ही पी.एच.डी. आहेत. बहिणीचे यजमान सुकुमार नायर हे रिटायर्ड मरीन इंजिनियर आहेत. तिचा तामिळनाडू मध्ये ॲक्टरपेक्षा चांगला पॅलेस आहे.
सदर सभागृहाच्या बांधणीसाठी आलेलल्या खर्चात सिंहाचा वाटा उचलला आहे तो माझी बहिण मीना राव हिने. मीना ही ऑस्ट्रेलिया येथे स्थायीक असून मुंबई, बेंगलूर, पर्वरी येथे तिचे फ्लॅट आहेत. त्यांचा मुलगा इस्रोच्या पॅरेलची एक संस्था आहे, त्याचा तो सदस्य आहे. त्यानेही उच्च शिक्षण घेतले आहे.
नितिन शां. नाईक- केमिकल इंजिनियर, पर्वरी येथे स्वतःचा बिझनेस आहे.
अभिजीत अवधूत नाईक- एम.ई. सिव्हील एनआरएफ. त्याचे वडील अवधूत नाईक 1966 सालचे टेक्सटाईल इंजिनियर आहेत. ते लोखंडवाला कॉम्पलेक्स येथे राहतात.
माझी बहिण प्रेमा आरस त्यांच्या दोन्ही मुली उच्च शिक्षण घेऊन लंडनमध्ये स्थायिक आहेत. माझा जावई अखिल आरोस्कर सिव्हील इंजिनिअर म्हणून वेंगुर्ला येथे काम करीत आहे. हे लिहिले ते फक्त कै. वासुदेव शां. नाईक कुटुंबाबद्दल. त्यांचे पण भाऊ शहरातच स्थायिक आमच्या पुढे गेलेले आहेत. त्यांचे इथे वर्णन करत नाही.
हा लेख लिहिण्याचा उद्देश 1955 ते 1965 या काळामध्ये आम्हाला चीनी कुटुंब म्हणून हिणवायचे त्याचे हे उत्तर. चीनी राष्ट्रासारखे ताकदवान. महाराष्ट्रात अशा प्रकारे बाँॅडिंग असलेले कुटुंब क्वचित मिळेल. आम्ही तोंडाने बोलत नाही. कृतीने उत्तर देतो. आम्हाला गर्व नाही. स्वाभिमान व अभिमान निश्चितच आहे. हे लिहिण्याचे महत्त्वाचे कारण अनेक लोकांना असे वाटत असेल की भल्या मोठ्या नाईक परिवारातील मंडळी कुठे असतील, नोकरी व्यवसाय काय करतात की आणखी काही, यांची ओळख व्हावी यासाठी हा लेखन प्रपंच.
मी परमेश्वर चरणी अशी प्रार्थना करतो की सदैव आमच्या पाठिशी रहा व आमच्या कडून होईल ती जनसेवा करून घ्यावी.
आमचे ज्येष्ठ बंधु शांताराम वासुदेव उर्फ अण्णा नाईक यांचा थोडक्यात परिचय. श्री. अण्णा यांनी स्वतः जास्त शिक्षण घेतले नाही. सर्वांना उच्च शिक्षण शहरात देणे त्यावेळच्या काळात शक्य नव्हते. त्यावेळी सोने 150 रु. तोळे होते. त्या काळात ते त्यांनी करुन दाखविले. आताच्या पिढीला दोन मुले सांभाळताना नाकीनऊ येतात. मग विचार करा.
ते भारतीय कामगार सेना लार्सन टुब्रो कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी 1969 पासून होते. दत्ताजी साळवी, वामनराव महाडीक, मान. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी बरोबर कमिटीमध्ये एक सदस्य होते. वेंगुर्ल्यातील अनेकजणांना त्यांनी नोकरीला लावले.
ॲड. श्रीनिवास नाईक यांचे कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग व वेेंगुर्ला येथे मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या चार शाखा आहेत. आतापर्र्यंत 3 लाख लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळवून दिली व रोजगार उपलब्ध केला. त्यांचा मुलगा राहुल हा ऑटोमोबाईल इंजिनियर असून जर्र्मनी येथे नोकरीला आहे. श्रीनिवास यांची पत्नी स्नेहा नाईक यांचा कुडाळ येथे नोव्हा कॉम्प्युटर नावाने व्यवसाय आहे.
वेंगुर्ले येथे मूळ घर मी स्वतः सांभाळतो. माझा मोठा मुलगा कुणाल नाईक याचे स्वतःचे टॅक्स कन्सल्टंट फर्म आहे. माझा लहान मुलगा अमित नाईक कॉन्ट्रॅक्टर व्यवसायात आहे. मी स्वतः प्रॉपर्टी डेव्हलपर आणि काजू ट्रेडिंगचा व्यवसाय सांभाळतो. माझी पत्नी एवन कॉस्मेटीक कंपनीची एजन्सी व दुकान गाळा चालवते. मी हे इथेच थांबत देवाकडे परत एकदा प्रार्थना करतो की आमच्या कुटुंबाला शक्ती दे.
– श्री. प्रकाश वासुदेव नाईक, माजी नगरसेवक 1985-96
वेंगुर्ला नगरपरिषद, मूळ घर- रामेश्वर मंदिर समोर