कोलकत्ता येथील मेडिकल कॉलेजमध्ये ३१ वर्षिय डॉक्टर महिलेवर बलात्कार करून क्रूर आणि निर्घूण हत्या करण्यात आली. सुमारे ३६ तास रूग्णसेवा करूनही त्या डॉक्टर महिलेला ना हॉस्पिटल प्रशासन वाचवू शकले ना शासन. या घटनेचा वेंगुर्ला येथील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक यांनी निषेध केला आणि करण्यासाठी वेंगुर्ला शहरातील दाभोली नाका ते हॉस्पिटल नाका असा मेणबत्त्या पेटवून मूक निषेध मोर्चा काढला. या मोर्चात वेंगुर्ला मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर्स तसेच परिचारिका, इरनव्हील व लिनेस क्लबचे पदाधिकारी, वेंगा फिटनेस ग्रुपचे पदाधिकारी, जनसेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, वकिल, सामाजिक कार्यकर्ते आणि संवेदनशील नागरिक सहभागी झाले होते.