संदिप भोसले यांना पोलीस महासंचालक पदकाने सन्मानीत

महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल दरवर्षी पोलीस महासंचालक पदक देऊन पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांना सन्मानीत करण्यात येते. सन २०२३ करीता वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांना पोलिस महासंचालक पदकाने राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी सिधुदुर्ग जिल्हा मुख्यालय येथे सन्मानीत करण्यात आले.

Leave a Reply

Close Menu